जीवनाची सेंकड इनिंग्ज सुरू करणा-या
तरुण आजी आजोबांसाठी…..
संगम सार्वजनिक सेवा समिती.
पद्मश्री लेट अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास .
संगम सार्वजनिक सेवा समिती
आमचा उद्देश्य :
घरातल्या वडिलधाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वटवृक्षच. मायेचं पांघरुण, प्रेमाची शीतल छाया देणारा, संस्काराच्या पारंब्यांनी आधार देणारा, सुख-दु:खात तटस्थपणे आधारस्तंभ बनणारा हा वटवृक्ष म्हातारपणाच्या ओझ्याने अस्थिर बनू पाहतो. एकेकाळी संपूर्ण घरचा आधारस्तंभ मानला जाणारा हा वटवृक्ष बऱ्याच जणांना अडगळ वाटतो. नकोसा होऊ लागतो. मग पुढची पायरी वृद्धाश्रमाची. मात्र वृद्धाश्रम हा शिक्षाच असतो असं नाही तर तिथलंही जीवन सुंदर असू शकतं.याच प्रयत्नांतून याच जीवनाची सेंकड इनिंग्ज सुरू करणा-या तरुण आजी आजोबांसाठी, संगम सार्वजनिक सेवा समिती नेहमी तटस्त पाठीशी आहे .
About
आमचे आधारस्तंभ
प्रसन्न, भारदस्त व्यक्तिमत्व
मुर्तिमंत चैतन्याचीच जणू खाण ,
वृद्ध कोण म्हणे यांना…
हे तर नव्वदीतले तरुण !!
काडीकाडी जमवूनि बांधला निवास इमला
सहचारणीचाही थोड़ा हातभार त्या लाभला !!
मा .श्री प्रल्हाद नरसिंह गोळे
स्वभाव स्पष्ट परखड गुणांची करीती कदर ,
घरातले लाडके बावा कुणाचे आवडते सर .
कधी ऐकती कौतुकाचे बोल कधी झेलती टिकेची झोड,
परि चालविती अपुलाच हेका बोलुनी गुलाबी गोड.
आनंद, उत्साह, अविरत कष्ट आदर्श यांचा द्यावा जना
दिला दिलासा अनेकांना करूनी वृद्धाश्रमाचा आरंभ
हेच आमुचे आधारस्तंभ
शतश: प्रणाम ह्यांना!
-मा . श्री प्रल्हाद नरसिंह गोळे
आम्ही देत असलेल्या सोयी/सेवा व सुविधा:
संगम सार्वजनिक सेवा समिती -ही संस्था म्हणजे एक प्रकारे लॉजिंग बोर्डिग (निवास-भोजन), रुग्णालय (वैद्यकीय सल्ला, उपचार), शाळा (नव्याने गोष्टी शिकाव्या लागतात) आणि कुटुंब (विस्तारित नाती आणि सामाजिक संबंध) अशा अनेक संस्थाप्रकारची वैशिष्टय़े एकत्र होऊन निर्माण झालेली व्यवस्था आहे.
अडीच एकरातील प्रशस्त आणि शांत परिसरात हा निवास १५ ऑगस्ट १९९९ पासून सेवारत आहे.
- कोणत्याही जात, धर्म व पंथातील स्त्री पुरुषांना सन्मानाने आणि प्रतिष्ठेने राहण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी हा उत्तम पर्याय आहे.
- सर्व प्रकारचे सण आणि उत्सव संस्थेत साजरे केले जातात.
नवीन प्रवेश घेऊ इच्छिणा-यांना ट्रायल बेसिसवर योग्य आकार देवून आधि काही दिवस राहून बघण्याची सोय आहे.
रजि, ऑफिस व व्यवस्थापक:
सर्वे नं. १५/२/१ ,पठारे स्टेडियम शेजारी व झेन्सार कंपनी जवळ, खराडी पुणे ४११०१४.
श्री केतन भिडे (व्यवस्थापक)
९९२३२३१५४५, ९६५७७२९८९५
श्री वृषाली पाठक (व्यवस्थापक)
९०६७६७२७३७
श्री अजित भिडे (सचिव)
7685900500, 7685900400
सदस्य
- श्री. केशव वझे (अध्यक्ष)
- श्री. जयंत नातू (कोषाध्यक्ष)
- श्री. केशव गानू (सभासद)
- श्री. दिलीप काळे (उपाध्यक्ष)
- श्री. रविनाला काकतकर (सभासद)
- श्री. आदेश गोखले (सभासद)
- श्री. अजित भिंडे (सचिव)
- सौ. सुप्रिया दामले (सभासद)
- सौ. श्रेया रानडे (सभासद)
1 साठवणीतील आठवणी 1
सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम – १५ नोव्हेंबर २०२२.
सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम – १५ नोव्हेंबर २०२२.