आमच्या बद्दल

संगम सार्वजनिक सेवा समिती

आमच्या बद्दल

गेल्या सुमारे तीन दशकांपासून विषेशतः ज्येष्ठ मध्यमवर्गीयांच्या जीवनात लक्षणीय बदल जाणवू लागला आहे. जागेची टंचाई, दोन पिढ्यांमधील जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन अशा अनेक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे. अशातच स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी, उज्वल भवितव्याचा विचार करून तरूण पिढी वैयक्तिक उत्कर्ष साधण्याच्या हेतूने परदेशात शिक्षण व जमल्यास तेथेच कायम वास्तव्य करू लागली आहे. • पालकांनी मात्र आपल्याच देशात राहणे पसंत केले आहे.

औषध उत्पादनाच्या क्षेत्रात व रोग निदान व निवारणाच्या क्षेत्रांत विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे मनुष्याची आयुर्मर्यादा लक्षणीयरीत्या वाढली आहे. तथापि वाढत्या वयाबरोबर स्वतःच्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता अनंत अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकटेपणा बरोबरच असुरक्षिततेची जाणीव सुद्धा वाढत असल्याने वयस्कर मंडळीची वाटचाल नैराश्याकडे होत आहे असे दिसून येते.

ह्या सर्व समस्यांचे समाधान बहुधा एका चांगल्या ‘वृद्धनिवासांत’ (वृद्धाश्रम नव्हे) असूं शकते ह्या मनोधारणेने सर्व शक्याशक्यतांचा सखोल अभ्यास करून वृद्धनिवासाची कल्पना साकार करण्याचा निर्णय संस्थेने घेतला व त्याची परिणती आजच्या कै. अण्णासाहेब बेहरे जेष्ठ (वृध्द) निवासाच्या रूपाने आपल्या समोर झाली आहे. ज्येष्ठ मध्यमवर्गीयांच्या सर्वसाधारण गरजा, खाण्यापिण्याची आवड व काही आधुनिक सोई सुविधा लक्षांत घेऊन त्या पुरविण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून संस्था करीत आहे.

प्रकल्पाचे कामकाज व्यवस्थित व सुचारू रूपाने चालावे यासाठी दिनांक २२ एप्रिल १९९० साली “संगम सार्वजनिक सेवा समिती” या नावाने एका ट्रस्टची स्थापना करून ती धर्मादाय आयुक्त पुणे यांजकडे पंजीकृत करून घेण्यात आली. त्याचा नोंदणी क्रमांक ई/१३५७/PN आहे. तसेच आयकर खात्याकडे नोंदणी करून कलम न (८०G खाली संस्थेला दिलेल्या देणगीला माफी मिळवण्यात आली. त्याचा क्रमांक १/८८९ दि. २८.५.९४ असून दर तीन वर्षाने त्याचे नूतनीकरण
करण्यात येते.

संस्थेची मुहूर्तमेढ कै. प्रल्हाद नरसिंह गोळे यांनी निस्वार्ध बुद्धिने व अविश्रांत श्रमाने रोवली. घरोघरी भेटी देऊन तसेच अनेक संस्थांकडे जाऊन मिळेल त्या देणग्या त्यांनी स्वीकारल्या. देणगीदारांमध्ये अगदी सामान्य व्यक्तींपासून असंख्य मान्यवर, संस्था, उद्योगपती, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.

अशाच प्रकल्पाबाबत सामाजिक बांधिलकीस (प्रतिपादन करणारे) मानणारे कै. अण्णासाहेब बेहरे यांनी त्यांच्या हयातीत आणि त्यांचे नंतर त्यांच्या संस्थेने कै. बेहेऱ्यांनी योजिलेली वीस लाख रूपयांची आर्थिक मदत केल्यामुळे त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे हेतूने वृद्ध निवासास त्यांचे नाव देण्यात आले. म्हणून हे वृद्धनिवास ‘कै. अण्णासाहेब बेहरे वृद्धनिवास’ या नावाने स्थित आहे. तर कै. दिनकर दत्तात्रय साठे यांनी स्वस्तात अडीच एकर जमीन उपलब्ध करून दिली.

.

कर्मचारी
आमचे काळजीवाहक प्रत्येक वेळी मोठ्या स्मितहास्याने प्रतिसाद देतात
सुरक्षा
अनुभव
उपक्रम
0
एकूण निवासींची संख्या
0 +
एकूण सेवेकरी
0 +
आनंदी ज्येष्ठ
0 +
वर्षांचा अनुभव