नियम व अटी
आपण विश्वासाने इथे यावं रमावं मित्रसवंगडी जमावेत …
जीवनाची सेकंड इनिंग सुखद आठवणीत आनंदात जगावी ...
प्रेम द्यायला , प्रेम मिळवावं …
नियम व अटी !
येथे नमूद केलेले नियम व अटी , संगम समितीचे सुरळीत व्यवस्थापन करण्यासाठी लागू आहेत. आणि समिती मध्ये नोंदणी करण्यापूवी नियम व अटी मान्य करणे व स्वीकारणे आवश्यक आहे.
नियम / 01
सभासदत्वासाठीचे नियम
- कोणत्याही जात, धर्म, पंथातील किमान ६० वर्षे पूर्ण झालेल्या स्त्री व पुरुषास प्रवेश मिळू शकतो
- प्रवेशोत्सुक व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्टया अपंग नसावी अर्थात व्याधिग्रस्त नसावी, तसेच स्वतःचे. काम स्वतः करण्यास सक्षम असावी.
- वैद्यकिय व्यक्तीने नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व शारिरीक क्षमतेचे डॉक्टरी श्यकीय स्टफिकेट प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- प्रवेश घेते समयी आवश्यक ते शुल्क जमा केलेले असले पाहिजे. शुल्काचा तक्ता सोबत दिलेला आहे.
- संस्थेमधे जेवण, नाश्ता, चहा वगैरेची सोय केलेली आहे. ही सुविधा घेणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त चहा पाणी स्वतःचे निवासात करण्यास सभासदांस मुभा आहे. पण मासिक शुल्कात सूट दिली जाणार नाही. तसेच गॅस, इलेक्ट्रीक शेगडी इत्यादींचा खर्च सभासदांस करावा लागेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने वय वर्षे ७५ च्या पुढील व्यक्तिंना अशी परवानगी दिली जाणार नाही.
- प्रत्येक सभासदाने स्वतःचे जेवण, चहा, नाश्ता वगैरे ‘सामूहिक जेवण गृहामधे घेणे बंधनकारक आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव डॉक्टरी सल्ल्यानुसार जेवणामधे थोडाफार बदल करण्याचा संस्थेद्वारा प्रयत्न करण्यात येईल. परंतु संस्था यास बांधील नाही.
- सभासदांस त्याला दिलेल्या खोलीतच राहण्याचे बंधन राहील. व्यवस्थापकीय सोईसाठी कारण परत्वे दिलेली खोली बदलण्याचा हक व्यवस्थापन राखून ठेवत आहे.
- स्वतःची खोली व आसपासची जागा सभासदाने साफ व स्वच्छ ठेवावी अशी अपेक्षा आहे. काही विशिष्ट अवस्थेत बाहेर जाण्याची परवानगी थोडीफार हालचाल व व्यायाम या योगे घडावा देण्यात येणार नाही.. म्हणून हे गरजेचे आहे. दररोज एकदा संस्थेच्या सेवकवर्गाकडून स्वच्छता करण्यात येईल.
- आंघोळीसाठी सोलर हीटर द्वारा गरम पाण्याची २४ तास व्यवस्था संस्थेने केलेली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बॉयलरही ठेवलेला आहे.
- शासकीय विजेला पर्यायी व्यवस्था आहे.
- वृद्ध निवासात मद्यपानास मनाई आहे.
- निवास स्थानात धुम्रपानास मनाई आहे.
वृद्ध निवासांत वा संस्थेच्या आवारांत प्राणी वा पक्षी पाळण्यास मनाई आहे.
वृद्ध निवासांत फक्त शाकाहारी भोजनाचीच व्यवस्था आहे.
- खोलीतील तसेच निवासातील सामान आपलेच आहे ही जाणीव ठेवून काळजीपूर्वक वापरावे. मोडतोड झाल्यास वा गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी सभासदाची राहील व झालेल्या नुकसानाची भरपाई सभासदाने करून द्यावी लागेल.
- निवास प्रमुखाच्या परवानगीशिवाय विजेची उपकरणे वापरण्यास मनाई आहे. मात्र तशी योग्य ती लेखी परवानगी दिली जाईल परंतु त्यासाठी निश्चित केलेला आकार सभासदांस द्यावा लागेल.
- संस्थेचे सामान, खोली वा निवासाबाहेर नेण्यास मनाई आहे.
- सभासदाने मौल्यवान वस्तू तसेच जास्त रोख रक्कम जवळ बाळगू नये. पैसे व वस्तू सांभाळून ठेवाव्यात. गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर असणार नाही.
- परगावी वा इतरत्र कोठेही जाण्यापूर्वी:-अ) जाण्याचे ठिकाण, पत्ता, तारीख, वेळ इत्यादी ऑफिसमधील वहीमधे लिहून ठेवावे. परत येण्याची अपेक्षित वेळही लिहावी. परत आल्याची नोंद करून स्वाक्षरी करावी. (ब) जाण्यापूर्वी व्यवस्थापकास आगाऊ सूचना द्यावी.(क) काही विशिष्ट अवस्थेत बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही . (ड) स्वतःचे सामान कपाटात कुलूप लावून बंद करून जावे.
- संस्थेच्या डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासण्यांची व्यवस्था संस्थेने केली आहे. स्वतःच्या स्वास्थ्याकरितां प्रत्येकाने तपासून घेणे महत्वाचे आहे.
- कोणत्याही प्रकारची व्याधी वा संसर्गजन्य आजार झाल्यास त्याची सूचना संस्थेस देणे आवश्यक आहे.
- गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास सभासदास ‘खाजगी अगर जवळपासच्या सरकारी इस्पितळात हलवणे गरजेचे झाल्यास संस्था तशी व्यवस्था करेल. कुठे दाखल करावे ह्याचा निर्णय सभासदांस करता येईल. जवळच्या नातलगास तातडीने कळविले. जाईल. सभासदाची इच्छा असेल तर नातलगांच्या ताब्यात दिले जाईल.
निवासी सभासदास नातलगांकडे जाक्याची इच्छा नसल्यास त्याची तहहयात काळजी घेण्याचा संस्था प्रयत्न करेल.
. निवासांत प्रवेश देणे वा नाकारणे याचा हक्क संस्था राखून ठेवत आहे. त्याची कारणे देण्यास संस्था बांधील नाही.
- संस्थेच्या सभासदास शिस्त न पाळण्याबद्दल वारंवार ताकीद देऊनही त्याने सुधारणा न केल्यास त्या सभासदास सभासदत्व रद्द करून संस्था सोडून जाण्यास बाध्य करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवत आहे.
- सभासद संस्थेत राहत असतांना त्याचे निधन झाल्यास त्याने दिलेल्या पत्त्यावर नातेवाईकांना बोलावण्यात येईल. परंतु १२ तासांचे आत शवाचा ताबा नातलगांनी न घेतल्यास त्याची योग्य ती व्यवस्था करण्यात येईल.
युनिट १ मधील एखादा सभासद सोडून गेल्यास अथवा निधन पावल्यास त्याचे ऐवजी दुसन्या सभासदास ती जागा देण्याचा संस्थेस अधिकार राहील. हे स्वातंत्र्य संस्था राखून ठेवत आहे. दुसऱ्या सभासदाऐवजी एकट्यासच ती खोली पुढे – हवी असेल त्यांस डिपॉझीट, मासिक शुल्क वगैरे असलेल्या नियमानुसार भरून तसे करता येऊ शकेल. मात्र व्यवस्थापनच असा निर्णय घेईल, असे करणे व्यवस्थापनावर बंधनकारक नाही याची मात्र नोंद घ्यावी .
निवासांत सभासदाने स्वयंचलित वाहन, सायकल हे स्वतःच्या जबाबदारीवर ठेवायचे आहे. वाहनाची चोरी अथवा मोडतोड झाल्यास त्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही .
- वैयक्तिकरीत्या सभासदांस टेलिफोन घ्यायचा असल्यास संस्थेकडून परवानगी घेऊन त्यास तसे करता येईल, अर्थातच त्यासंबधींचा खर्च सभासदांस (सहन करावा लागेल. संस्थेकडे सध्या एकच टेलिफोन आहे. आणखी एक टेलिफोन घेण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
बिन व्याजी ठेवीच्या रकमेचा विनियोग वैद्यकीय उपचारासाठी करण्यात येतो. परंतु हा खर्च सभासद परत आल्यावर जास्तीत जास्त तीन महिन्यांत त्याने भरून ठेवीची मूळ रक्कम त्याने पूर्ण करायची अट आहे.
- ठेवींची रक्कम निवास सोडून गेल्यास किंवा सभासद मृत झाल्यास परत करण्यापूर्वी त्याचेकडे काही येणे असल्यास ती रक्कम वजा करून उर्वरित रक्कम संस्थेची आर्थिक परिस्थिती पाहून जास्तीत जास्त तीन महिन्यात परत केली जाते. मृत सभासदाची ठेव नाम निर्देशनाप्रमाणे निर्देशित व्यक्तिस परत केली जाते.
- वैयक्तीक मालकीच्या वस्तूची जपणूक सभासदाने स्वतः करावयाची आहे. वस्तू गहाळ झाल्यास किंवा चोरीस गेल्यास संस्था जबाबदार राहणार नाही याची नोंद सभासदांनी घ्यावी.
- खोली उपलब्ध नसल्यास सभासदत्वासाठी नव रजिस्टर करण्यास रू. २५०००/- बिन व्याजी ठेव दिल्यास व्यक्तीचे नाव रजिस्टर करता येईल. हा क्लेम जास्तीत जास्त पांच वर्षासाठी असेल. या अवधीत जागा मिळू न शकल्यास ठेव परत करण्यांत येईल. पण त्या व्यक्तिचे नांव प्रतिक्षा यादीत कायम राहील. व्यक्तीने या अवधीत विचार बदलल्यांस त्याचे इच्छेनुसार ठेव अगोदरही परत केली जाईल. पण त्याचा क्लेम राहणार नाही.
१५ किंवा १५ पेक्षा जास्त दिवस गैरहजर राहणान्या सभासदास रु. १५/ प्रति दिवस बीलात सवलत देण्यात येईल. प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ६० दिवसांची सवलत दिली जाते.
नियम / 02
निवासी सभासदांनी पाळावयाचे नियम
- आपली खोली, स्नानगृह व परिसर स्वच्छ ठेवावा.
- युनिट १ मधे दोन व्यक्ती वास्तव्यास असताना प्रत्येकाने एकोप्याने व सहकार्याने राहणे अपेक्षित आहे. आपला त्रास दुसऱ्या व्यक्तीस होणार नाही याची खबरदारी येणे जरुरीचे आहे. एखाद्या सभासदांबाबत दुसऱ्या सभासदाने वारंवार तक्रार केल्यास त्याचा खरेखोटेपणी तपासून त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करून निवास सोडून जाण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापनास आहे याची कल्पना प्रवेश घेते वेळी दिलेली आहे. असा कटू प्रसंग संस्थेवर येऊ नये याची काळजी सभासदानें घ्यावी अशी विनंती आहे. इतरही कुठल्या सभासदां विषयी वारंवार तक्रार आल्यास व याची कल्पना देऊनही अशा सभासदाचे वागणुकीत बदल न झाल्यास संस्थेस त्याचे सभासदत्व नाईलाजाने रद्द करण्याची कारवाई करावी लागेल याची सभासदांनी नोंद घ्यावी.
- चहा, नाश्ता, भोजन, निवास या सुविधांचा लाभ घेण्यासाठी जर पाहुणे येणार असतील तर त्याची पूर्वसूचना व्यवस्थापनास कृपया द्यावी.
- पुणे किंवा अन्य ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जाताना त्याची नोंद ऑफिसमधे करावी परत येण्याची अपेक्षित वेळ नोंदवून ठेवावी तसेच मुक्कामासाठीची माहिती, फोन इ. लिहून ठेवावी. काही अडचण आल्यास ही माहिती उपयोगी पडेल. परत आल्याची नोंदणी ऑफिसमधे करून आपली स्वाक्षरी करावी.
- (अ) झीप टेलीफोनचा वापर करताना केलेल्या टेलीफोन क्रमांकाची कटाक्षाने वहीत नोंद करावी, आपले बोलणे आवश्यक तेवढेच सीमित ठेवावे म्हणजे फोन जास्त वेळ एंगेज राहणार नाही. ही सुविधा सामूहिक आहे व संस्थेत एकच फोन आहे. याची जाणीव ठेवावी.ब) बाहेरून येणारे फोन ऑफिसमधील फोनवर येतात. तेव्हा बोलणे सीमित ठेवावे म्हणजे फोन जास्त वेळ एंगेज राहणार नाही.
नियम / 03
भोजन व्यवस्थेसंबंधी नियम
- सभासदांनी भोजनालयात प्रवेश करताना शक्य खोली ते भोजनालय अशा ठिकाणी वापरात असलेल्या स्लीपर्स वापराव्या. इतर पादत्राणे वापरल्यास ती भोजनकक्षाच्या बाहेर काढून ठेवावीत .
- भोजनालयात बसण्याची क्षमता मर्यादित आहे. त्यावेळी आपल्या भोजनाच्या वेळेचे नियोजन. करून पाईगर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ठरलेल्या वेळेअगोदर वा वेळ संपल्यानंतर सेवेची अपेक्षा करू नये व त्याबाबत बादाची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी ठरलेल्या वेळेखेरीज इतर वेळी सुविधा नाकारली गेल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
- भोजनालयात देण्यात येणारे पदार्थ तेथेच खावे, प्यावे. डब्यात भरून खोलीत घेऊन जाण्यास परवानगी नाही.
- . स्वयंपाकघरांत अधिकृत कर्मचारी संस्था व्यवस्थापक तसेच संस्था प्रमुख यांचेखेरीज कुणाही सभासदास प्रवेशास मनाई आहे.
- आपल्या आवडी वा गरजेनुसार कुठलाही पदार्थ करून मागण्यास मनाई आहे. असे करण्यास नकार दिला गेला तर सभासदाने आपला अपमान करून घेतला असे समजून त्याबाबत संस्था काही करू शकणार नाही.
- भोजनालयातील अथवा वाढावयास आणलेले पदार्थ हाताळण्यास वा निवड करण्यास सक्त मनाई आहे.
- एखादा पदार्थ आवडला नाही किंवा पथ्यामुळे घेणे शक्य नसल्यास वाढतानाच तसे सांगून अन्नाची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- रूम सर्व्हिस मधे दिलेले पदार्थ न संपल्यास ते योग्य ओल्या कचऱ्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत टाकावे. जमिनीवर अथवा खिडकीतून बाहेर टाकू नये. त्यामुळे मुंग्या वा इतर कीटक यांचा प्रादुर्भाव होतो व त्याचा सभासदांस उपद्रव होण्याची शक्यत असते.
- भोजन बाणान्यांची संख्या मर्यादित आहे. शक्यतोवर वाढायला आल्यावर हवे असल्यास पदार्थ घेऊन ठेवावा. त्याने पाठ फिरवताय तोच पदार्थ मागू नये, त्याला इतर सभासदांना देखील वाढावयाचे असते. तोच पदार्थ वाढावयास विलंब होणे स्वाभाविक आहे हे लक्षात घेऊन सबुरीने घ्यावे.
- कोरडा कचरा खोली मधील कचरापेटीत टा ओला कचरा त्यामधे टाकू नये.
- रूम सव्हीसमये देण्यात येणारे जेवण भोजनालयातील जेवणा इतके गरम असू शकत नाही, तशी अपेक्षा सभासदाने करू नये.
- भोजन व नाश्ता शाकाहारी असतो. मांसाहारी पदार्थ देण्यात येत नाही याची नोंद सभासदाने घ्यावी.